Marathi Mandal Oslo, NORWAY



Home History Activities Location Delegate Fees Sightseeing Reviews Sammelan

Suswagatam!

Hello and welcome to the Marathi Mandal Oslo, NORWAY

Ganesh Chaurhi 2008

Slideshow Ganesh Chaturthi 2008

Ganesh Chaturthi 2008

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मराठी मंडळाचा गणपती बसवायचे ठरले आणी तेही श्री. अरुण ऒरंगाबादकर ह्यांच्या घरी. ह्यावर्षीचे मुख्य आकर्षण होते ते पुरषोत्तम कुलकर्णी ह्याने आणलेल्या गणेश मुर्तीचे! पुरषोत्तम ने भारतातुन छोटीशीच पण सुंदर मुर्ती अगदी नीट जपुन ओस्लो पर्यंत सुखरुप आणली.

सॊ. पल्लवी व श्री. योगेश पुराणीक आणी श्री. अनीरुद्ध धोंडगे ह्य मंडळींनी गणपती साठी एक सुरेख मंदीर बनवले. गणेश स्थापना ह्या वर्षी कामाच्या दिवशी होती तरी देखील बरीच मंडळी स्थापने साठी सकाळी हजर राहीली. संध्याकाळच्या आरतीची वेळ ६:३० ठरली, व कार्यक्रम आणी विसर्जन रविवारी करण्याचे ठरले. ठरल्या प्रमाणे रविवारी अथर्वशिर्षाचे २१ वेळा आवर्तन आणी मग आरती झाली, नंतर सगळ्या मंडळींनी मोदक, श्रीखंड पुरीची पंगत केली, आणी मग झाली कार्यक्रमाला सुरुवात. सॊ. अमृता सोनंदकर हीने एक छानसे शास्त्रीय गाणे आणी पुण्यातल्या घराची आठवण काढुन ’त्या तीथे, पलीकडे’ हे सुंदर गीत सादर केले. त्यानंतर सर्व मंडळीनी गाण्याच्या भेंड्या आणी ’डंब शेराडस’ खेळाची मजा लुटली. छोटया शॆवी ने ’आसावा सुंदर चॊकलेटचा बंगला’ हे गाणे सादर करुन बाळपणीच्या आठवणीत नेउन सोडले.

नंतर निरोप आरती म्हणुन उत्सव मुर्ती तशीच ठेउन सुपारीच्या ग्णपतीचे ’मोर्या ’ म्हणत विसर्जन केले. अशात-हेने गणपती बाप्पा गेल्याचे दुख: आणी सगळी मंडळी भेटल्याचा आनंद घेत सर्व मंडळी घरी परतले.

Slideshow Summer Picnic 21 june 2008

Summer Picnic 21st june 2008

उन्हाळा, सुटी म्हण्जे सगळ्यांनाच आनंदाचे दिवस, त्यतून नॊर्वेसारख्या देशात जवळ जवळ ४ - ५ महिने अंधारात आणी थंडीत काढ्लेल्या लोकांना उन्हाळा म्हणजे एक पर्वणीच! अशाच उन्हाळ्यात ह्यवर्षीची ’सम्मर पिकनिक’ २१ जुन, २००८ म्हणजेच वर्षातल्या सर्वात मोठया दिवशी ठरली.

ह्यावर्षी लोकं थोडी कमी असल्यामुळे श्री. अरविंद फ़ाटक यांच्या घरी पिकनिक करण्याचे ठरले. स्वच्छ उन्ह असल्यामुळे सर्वांनाच उत्साह होता. ह्यावेळेस बरीच नवीन मंडळी होती, त्यामुळे थोडा वेळ ओळ्ख, गप्पा ह्यात जाउन लगेच गरमागरम पावभाजी, पुलाव, ’ग्रील चिकन’ अशा चमचमीत खाण्याचा कार्यक्रम झाला. नंतर रात्रीचे ९ वाजले तरी बाहेर चकचकीत उन पाहुन्सर्वांनी जवळच असलेल्या ग्राउंडवर फ़ुटबॊल खेळण्याचे ठरले. तास भर खेळ्ल्या नंतर सर्व मंडळी ’गोड’ खाण्यास परत जमा झाली. आईस्क्रिम व आंबा ह्यावरती सर्वांनी येथेच्छ ताव मारला. खात - खातच थोडा वेळ बॆठे खेळ खेळ्ण्याचे ठरले. प्रतिमाने आणलेले उखाणे प्रत्येकाला वाचायचे होते, नुसतेच नाही तर प्रत्येकाच्या नव-याने मधे उभे रहायचे होते. नंतर शॆवी पुराणिक ह्या चिमुकलीने ’गोरी गोरी पान’ ह्या गाण्यावरती सुरेख न्रत्य केले.

अशा त-हेने ह्यावर्षीची ’सम्मर पिकनिक’ रात्री साडे अकराच्या सायंप्रकाशात संपन्न झाली!

- केतकी ताडे, ऒस्लो

Kavdekar Mami by Deepa Tade 4 MB

Summer Picnic - 21st june 2008

Just like Last year this year too Maharashtra Mandal Norway is arranging a summer picnic on 21 st june 2008.

The summer picnic this year is planned for the 21st June (Saturday) at Sζtren Gεrd from 17:30 onwards. We plan to have a bonfire as per Scandanavian mid-summers day tradition. Dinner will be a mix of grill and Indian dishes. Details of the location and program will follow soon

Diwali Celeberations 2007

दिवाळी म्हणजे सर्वात उत्साहाचा, आनंदाचा सण, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा! ह्या वर्षीची दिवाळी खरच अविस्मरणीय झाली, ती श्री. अरविंद फ़ाटक यांच्या नवीन घरी. संध्याकाळ्च्या वेळी, बाहेर सगळीकडे मेणबत्यांच्या प्रकाशात घर लांबूनच झळाळत होते. जवळ जवळ ३० एक मंडळी जमा झाली होती. नवीन मंडळींनी उत्साहाने चिवडा, बेसन लाडू, सामोसे बर्फ़ी फ़राळा साठी करुन आणले होते, त्याचा सर्वांनी येथेच्छ समचार घेतला.

फ़राळा नंतर छानपॆकी अंताक्षरीला सुरुवात झाली. सर्व पुरुष आणि सर्व कुटुंब असे दोन गट पडले. काही वेळाने अंताक्षरी अगदी जुगलबंदीवर आली, अगदी जुनी गाणी आणी नविन गाणी यांची! मॆफ़ल मस्तच रंगली होती. नंतर सर्वांनी पनीर आणि खीरीच्या बेतावर मस्तपॆकी ताव मारला.

अशातर्हेने मराठी मंडळ नॊर्वेची ह्यावर्षीची दिवाळी अगदी उत्साहात साजरी झाली. सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आणि श्री. फ़ाटक यांना नवीन घ्रराच्या शुभेच्छा देत दिवाळीची सांगता केली.

- केतकी ताडे, ऒस्लो

Slideshow Deepawali 2007

Slideshow Deepawali 2007 - Dadasaheb Patil Oslo

 
 
 
नॊर्वेत गणेशोत्सवाची सुरुवात गेल्या वर्षी श्री. शरद कापुसकरांनी घडविलेल्या सुंदर गणपतीच्या मुर्ती ने झाली. ह्य़ा वर्षी देखील सर्व मंड्ळी ने गणेशोत्सव पुर्ण उत्साहाने साजरा केला, इतकेच नव्हेतर ह्या वर्षी ऒस्लो मधे दोन ठीकाणी गणेशाची स्थापना झाली ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे.   गेल्या दोन वर्षापासुन कामा निमित्ताने बरीच मराठी मंड्ळी नॊर्वेला यायलागली त्या निमित्ताने हा उपक्रम सुरु झाला आहे. आणी हा असाच पुढे चालु राहील अशी अपेक्षा आहे.
 
गणेश पुजनानंतर श्रीखंड पुरी व मसाले भाताच्या जेवणाचा स्वाद सर्वानी पुरेपुर घेतला. जेवणांनंतर गप्पागोष्टी, गाणी व इतर विविध कार्यक्रमानी उपस्थित मंडळींनी सर्वांचे मनोरंजन केले.  मनोरंजनाच्या कार्यक्रमात धनंजय रानडे यानी सादर केलेली दोन गिते व दीपा ताडे नी उस्फ़ुर्त पणे सादर केलेले पु, ल. देशपांडय़ांच्या वारयावरचीवरात मधील कवडेकर मामींचे संवाद सर्वांच्या लक्षात दीर्घ काळ राहतील. नीतीश तिवारींनी शेरोशायरी, काही हींदी गाणी व सुजाता प्रभु, अरविंद फ़ाटक यानी भजने गाउन सर्वांचे मनोरंजन केले.
 
 

Slideshow Ganesh Chaturthi 2007

Slideshow Ganesh Chaturthi 2007 - Dadasaheb Patil Oslo

Upcoming Events

Summer Picnic - 8th july 11 AM to 5 PM

Inspite of cloudy / rainy / dull weather, enthusiasm of all the newcomers and old timers made Summer picnic a great success. Everybody participated in playing volleyball and Grilling Chicken and Hotdogs. Lunch was followed by screening of ever green Marathi drama "Tarun Turk Mhatare Ark". Hope this trend will continue in future.

Ganesh Chaturthi celeberation - 15th and 16th september 2007

Slideshow Summer Picnic july 2007

Interesting news - Information

This year Seattle Maharashtra Mandal, USA is organising BMM 2007 Conventon in Seattle from
28th june to 1 July. For details please have a look at their website BMM 2007 Convention Seattle, USA

This year Maharashtra Mandal London is celebrating 75th anniversary "Amrut Mahotsav".
For details please have a look at their website Maharashtra Mandal London  


Another important news is Naharashtra Mandal France has taken up the initiative to stage
"7th European Marathi Sammelan - 2008". For details please keep watching
their website Maharashtra Mandal France

Slideshow Ganesh Chaturthi Oslo 2006

6th European Marathi Sammelan - Holland

Slideshow EMS 2006 Holland

Slideshow Sammelan

Prachiti Suru Ukhane - Low resolution 1.3 MB

Prachiti Suru Ukhane - High resolution 13 MB

Lavani nritya by Shruti Prabhu - Low resolution 1.7 MB

Lavani nritya by Shruti Prabhu - High resolution 14 MB

Bollywood Dance by Shruti Prabhu - High resolution 4 MB

If you have any questions or suggestions please e-mail to:

Mr. Arun Aurangabadkar:
aauranga@online.no
Tel : +47 22193850

Mr. Shrikant Prabhu: Shrikant.Prabhu@nexans.com

Other Useful Links:
Marathi Websoochi
Marathimandal Switzerland
Marathimandal Sydney
Maharashtra Mandal London
Brihan Maharashtra Mandal of North America (BMM)
Seattle Maharashtra Mandal
Maharashtra Mandal Kuwait
Maharashtra Mandal France

Marathi News Papers:
Sakal
Loksatta
Lokprabha

Special Links:
G. D. Madgulkar
P. L. Deshpande
Geet Saragam