"Maharashtra Mandal Norway" A Registered Association with Brønnøysundregistrene Norway. Registration No. < 986 130 608 > since 13-Oct-2003

Suswagatam!

Hello and welcome to the Marathi Mandal Oslo, NORWAY

 

17th May 2020 Norwegian National Day

Youtube link 17th May Dhruva Patil

Deepavali 2019

Slideshow Deepavali 2019

Diwali Introduction by Amol & Trupti

Diwali video 2

Diwali video3

Diwali video4

Diwali video5

Diwali video6

Diwali video7

Diwali video8

Shaurya Bhise Piano

Link to Deepavali 2019 photos by Ashish Manjrekar

Link to Deepavali 2019 videos by Ashsish Manjrekar

Kojagiri 2017

Slideshow Kojagiri 2017

Slideshow Video Kojagiri 2017

Gudi Padwa 2017

Ganesh Chaturthi 2016

Slideshow Ganesh Chaturthi 2016

Slideshow Video Ganesh Chaturthi 2016

Youtube link Manglagaur skit by Trupti and Prajakta

Youtube link Manglagaur Dance by Trupti, Prajakta, Deepali and Vaishali

Youtube link Kids dance by Aryana, Bhuvi, Shreyas and Atmaj

Dance by kids

Dance by Shriya Danve

Pinga ga bai Pinga Dance

Song by Ovi Kulkarni

Song of Ganapati

Song by Shri. Hemant Patil

Vittal Song by Ankur Tade

Apsara Aali Dance by Dhruva

Deepawali 2015

Slideshow Deepawali 2015

Deepawali Dance Performance 2015

Deepalii Karegaonkar Dance

Dance by Rahul & Kashmira Shinde

Song by Pia Kulkarni

Song1 by Adit More

Song2 by Adit More

Fireworks 2015

Song by Aarav Barve

Dance by Aarav Barve

Song By Amruta Sonanadkar

Dance By Snehal Sole

Rajendra & Shilpa Danve Skit

Dance by Riya Thorat

Arnav Hula Hoopla Dance

Chavat Boys returns Dance

Childrens Dance

Song by Hitika

Dance by Deepa & Rohini

Dance by RevaNandedkar

Ganesh Chaturthi 2015

Slideshow Ganesh Chaturthi 2015

Slideshow Video Ganesh Chaturthi 2015

Dance by Kashmira Shinde

Dance by Dhruva Shinde

Song by Vaibhav Shinde

Song by Astha Dave

Dance by Dhruva, Reva & Hitika

Ganesha Aarti by Arvind & Aruna

Dance by Rewatkars, Shriwardhankars & Shinde Family

Adit Mores Atharvashirsh

Adit Mores Atharvashirsh Shortvideo

Atharvashirsh video

Dance by Aaryana Shriwardhankar

Summer Picnic 2015

Slideshow Summer Picnic 2015

Ganesh Chaturthi 2014

Slideshow Ganesh Utsav 2014

गणेश चतुर्थी २०१४

 '' गणपती बाप्पा मोरया sssss '' !!!!

 बाप्पा येणार येणार असे म्हणत असतानाच बाप्पा 'ओस्लो ' मुक्कामी येउन गेले सुद्धा …..

 आपल्या मंडळाचा गणेश उत्सव अगदी थाटात साजरा झाला . दरवर्षी वाढत जाणाऱ्या मराठी मंडळींची उपस्थिती लक्षात घेता , यावर्षी प्रथमच मोठ्या हॉल मध्ये गणेश उत्सवाचे प्रयोजन करण्यात आले होते . त्यामुळे जास्तीत जास्त मंडळीना याचा आनंद घेता आला .

 यावर्षी  'औरंगाबादकर ' जोडप्याने पारंपारिक पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना केली . आणि हो , महत्वाचे म्हणजे या  वेळेस आपल्या बाप्पांची पूजा ' सौ.  सुचेता सोनन्द्कर ' ( आपल्या मंडळा तील सागर सोनन्द्कर यांच्या आई )  यांनी अतिशय शास्त्रशुद्ध अन सुंदर रित्या सांगितली .

 यावेळेस बाप्पा अगदी  वीकेंड बघून आल्यामुळे त्यांचा मुक्काम अगदीच छोटा म्हणजे १ १/२ दिवसाचा होता . शुक्रवारी सकाळच्या प्रतिष्ठापनेनंतर संध्याकाळच्या आरतीला हि बरीच नवी मंडळी उपस्थित राहिली होती . शनिवारी विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . दुपारी
 ११. ३० ला सर्व मंडळी जमली . मोठ्या जयघोषातील  आरती आणि मंत्रपुष्प याने वातावरण अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले.  यानंतर नेहमी प्रमाणेच अथर्वशिर्षाचे  २१ वेळा आवर्तन झाले . यामध्ये बरीच नवे लोक आवर्जून सहभागी झाले . बाप्पाला 'मोदकांचा '  नैवेद्य  दाखवून सर्व मंडळीनी भोजनावर यथेच्छ ताव मारला .
 परदेशामध्ये गणेश उत्सव साजरा करता आला ते हि अगदी घरगुती न पारंपारिक रित्या म्हणून बरीच नवीन मंडळी भलतीच खुश होती... काही तर अगदी भावनाविवश झाली होती .

 नंतर गाण्याची झक्कास मैफल रंगली. बऱ्याच नवीन हौशी कलाकारांनी यात सहभाग घेतला. लहान मुलांसहित मोठ्यांनीही ''संगीत खुर्ची'' चा आनंद घेतला . हे होता होता संध्याकाळचे ५ कधी वाजले हे कळलेच नाही . गणरायाचे आरती नंतर 'मंगलमुर्ती मोरया.. पुढच्या  वर्षी लवकर या ... अशा गजरात विसर्जन झाले.

 धन्यवाद .

 अश्विनी नांदेडकर.

Deepavali 2013

Slideshow Deepavali 2013

Diwali Pictures by Aditya Sole

Diwali Pictures by Mehul Tamboli

Deepavali Deep Nritya by Seema, Swati, Shamal, Kasturi, Deepali

Lavani by Amruta

Masaledar Patra vachan by Aditya Sole

Ka Re Doorava song By Prajakta Ranade

Song by Reva & Ashwini Nandedkar

Ajeeb Dastan hai Ye song By Smita Aurangabadkar

Jayostute by Amruta, Prajakta, Priya, Punam, Ashwini & SmitaReva & Ashwini Nandedkar

Kojagiri 2013

Slideshow Kojagiri 2013

Nishana Song by Amruta Sonandkar

A Nice gazal by Amruta Sonandkar

Ganesh Chaturthi 2013

 

 

 

          

 

नमस्कार मंडळी,

 

 

आज भाद्रपद शु. चतुर्थी ! सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सवाचा आरंभ !

 

ऑस्लो मध्येही आपल्या मराठी मंडळाचा  श्री गणेशोत्सव सुरु झालेला आहे.  

ह्यावर्षी अंकुर ताडे यांनी पूजा सांगून; किरण - अश्विनी नांदेडकर यांनी श्री गणेशाची मोठ्या उत्साहात, थाटा- माटात, मंगलमय वातावरणात सकाळी प्रतिष्ठापना केलेली आहे

 

आजपासून १३ सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी :३० आणि संध्याकाळी :३० वाजता आरती असेल. ह्या दिवसांच्या आरतीचा लाभ सर्व जण घेऊ शकता.  आरतीचे सर्व सामान तिथेच उपलब्ध आहे

 

१४ १५ ची आरती सकाळी ११:३० वाजता असेल. त्या दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती मी आधीच्या मेलमध्ये दिलेलीच आहे.  त्याव्यतिरिक्त काही शंका असल्यास मला कळवा.

 

धन्यवाद !

 

 

गणपती बाप्पा मोरया  !!!!!

 

 

 

Ganesh Chaturthi Pictures by Mehul Tamboli

 

Summerpicnic 2013

Slideshow Summer Picnic 2013

Video Slideshow Summer Picnic 21st july 2013

Deepavali 2012

नमस्कार मंडळी,
दिवाळी चा कार्यक्रम करायचा , काय काय करायचे हे बरेच दिवसांपासून सुरु असतानाच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाही!
कार्यक्रमाची सुरुवात हि लक्ष्मीपूजनाने आणि श्रेयस ताडे (७ वर्षे) ह्याच्या "असतो मा सद्गमय" ह्या श्लोकाने झाली.
अश्विनी आणि दीपा ह्यांनी सूत्रसंचालन करता करता एक लोकगीत सदर केले कि ज्यामधून आपल्या मराठी मंडळाची माहिती सर्वाना मिळाली.
निरंजन रानडे ह्याच्या सुश्राव्य बासरी वादनाला अंकुर ताडेने तबल्याची साथ दिली.
प्राजक्ता रानडे हिने पु.लं.चे एक मस्त कथाकथन सदर करून पु.लं.च्या आठवणी जाग्या केल्या.
सागर आणि अमृता यांनी ह्यावर्षी एक आगळीवेगळी जी प्रश्न-मंजुषा तयार केली होती ती सर्व लोकांमध्ये मस्ते रंगली.
खमंग आणि खुसखुशीत विविध फराळाच्या ब्रेक नंतर यश मुळ्ये याने keyboard वर उत्कृष्ट गाणी सदर केली.
निरंजनचे काव्यविडंबन आणि जोगळेकर काकुंचे काव्यवाचन ह्या दोन मजेशीर आणि अर्थपूर्ण कार्यक्रमांनी सर्वांना पोटभर हसवले. अमितचे तबला वादन आणि मंगेश चा हार्मोनियम याने कार्यक्रमात मस्त रंगत आणली.
पुरुषांच्या काही मोजक्या क्षेत्रांमध्ये बायकांनी काम करायचे ठरवले तर कशी मजा येईल किंवा गोंधळ उडेल हे एका नाटिकेतून सदर केले.
नाटिकेचे नाव होते- "फक्त स्त्रीयांसाठी" ज्यामध्ये पायल, प्राजक्ता, सुजाता प्रभू, श्रुती, शामल, प्राची, प्रिया, आणि हर्षिता यांनी उत्तम भूमिका केली.
स्नेहल सोले हिने "राधे कृष्ण नाम " ह्या गाण्यावर सुंदर नृत्य सदर केले. शोनित सावंत याने एक उत्स्फुर्त विनोदी काव्य वाचन केले.
ह्या कार्यक्रमानंतर सर्वानी जेवण आणि गाजर हलव्याचा आस्वाद घेतला.
लहान मुलांसाठी फुलाबाज्याही आणल्या होत्या. त्या फुलबाज्या उडवून सगळी चिल्ली पिल्ली जाम खुश झाली.
धन्यवाद !
दीपा ताडे.

Slideshow Deepavali 2012

Slideshow Video Deepavali 2012

Norway powada by Deepa, Ashwini, Amruta & Prajakta Diwali 2012

Norway powada by Deepa, Ashwini, Amruta & Prajakta Diwali 2012

Basari Vadan By Niranjan Ranade Diwali 2012

1. Keyboard By Yash Muley Diwali 2012

2. Keyboard By Yash Muley Diwali 2012

Dance by Snehal Sole Diwali 2012Ganesh Utsav 2012

नमस्कार मंडळी, गणेशोत्सवाची तयारी करायची असे म्हणता म्हणता कार्यक्रम झाला देखील. ह्या वर्षी पोटदुखे कुटुंबीयांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली.
५ दिवसांचा उत्सव असल्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी आरती झाली. रविवारी विसर्जनाच्या दिवशी सर्व मराठी मंडळ एकत्र आले होते. आरती, अथर्वशीर्षाची आवर्तने केली. श्रीखंड-मोदकाचे जेवण आणि नंतर काही खेळ खेळले. ४ वाजता परत आरती करून " मंगलमुर्ती मोरया" च्या जयघोषात गणेशाचे विसर्जन झाले.

Slideshow Ganesh Utsav 2012

Slideshow Video Ganesh Utsav 2012

Summer Picnic 2012

नमस्कार मंडळी, पाऊस आणि आपली पिकनिक.. ..काहीतरी नाते आहे. तारखा बदलूनही पाऊस पाठ सोडत नाही. परंतु ह्यावेळेस थोडासाचा पडून पावसाने हजेरी लावली. पण नुसत्या ढगाळ वातावरणात, थोडेसे थंड हवामान आणि बाजूला सगळीकडे हिरवळ अशा मस्त ठिकाणी sæteran gård ला पिकनिक झाली. सर्वांनी आणलेल्या विविध पाककृतीचा आस्वाद घेता आला. काही जण वॉली बॉल , फुटबॉल, आणि लाकडांच्या बनवलेल्या वेगवेगळ्या पुलांवर खेळले. अनघा-निखील यांनी मुलगी झाल्याबद्दल मिठाई वाटली. शिवाय निखीलने आईचा वाढदिवसानिमित्त केक देऊन "surprise" दिले. चहा, आंबा नि आईस्क्रीम खाऊन पिकनिक ची सांगता झाली.

Slideshow Summer Picnic 1st july 2012

Deepavali 2011

Youtube link to Seema Muley poem recital Video

Youtube link to Sujata Prabhu's poem recital Video

Youtube link to Shaivi's Dance Video 2011

Youtube link to Kashmira Muley & Prachi Pawaskar Dance Video

Youtube link to Yash Muley Keyboard Video 2011

Youtube link to Yogesh & Pallavi Puranik's Video

दिवाळी म्हणजे रांग दिव्यांची अगणित ,
अंध:कार दूर करून आनंद करते द्विगुणीत !!
दिवाळी आली म्हणता म्हणता येऊनही गेली.आपला मराठी मंडळाचा कार्यक्रम रविवारी उत्तम रित्या पार पडला.
अश्विनी, योगेश यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वी रित्या सांभाळले.
कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी पूजन, आरतीने झाले. त्यानंतर नवीन मंडळींची ओळख झाली तेही निखिलेश ने सांगितलेल्या नवीन गंमतशीर खेळाने.
दोन व्यक्तींनी मंचावर जाऊन एकमेकांबद्दल माहिती द्यायची पण त्यातली एक गोष्ट खोटी असली पाहिजे आणि ती कोणती हे इतर लोकांनी ओळखायचे! म्हणजे बरोबर नवीन मंडळी लक्षात राहतील.सोबत मस्त, चमचमीत, खमंग फराळ होताच. चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, लाडू, बाकरवडी, चिरोटे, कारंजी, जिलेबी..(हं, तोंडाला पाणी सुटले न परत !) अश्विनीने दिवाळीचे अर्थपूर्ण महत्व सांगितले.

त्यानंतर छोटे खेळ, प्रश्न-पंजुषा, spot games, विनोद, असे कार्यक्रम घेऊन सर्व लोकांना मनोरंजनाच्या कार्यक्रमात सामील करून घेतले.यामध्ये बरोबर उत्तर देणाऱ्याला,विनोद सादर करणाऱ्याला बक्षीश म्हणून एक एक चोकलेट मिळत होते. हे पाहून छोट्या श्रेयस ला स्फुरण चढले आणि चक्क पुढे जाऊन " वाका वाका" हे शकिराच्या गाण्याचे धृपद म्हटले. पण त्याला काही बक्षीश मिळाले नाही. मग त्याच्या लक्षात आले कि मराठी मंडळाच्या कार्यक्रमात मराठीच गाणे म्हटले पाहिजे, आणि मग त्याने "प्रारंभी विनातीकरू " हे स्तोत्र म्हणून टाळ्या आणि मोट्ठे चोकलेट मिळवले..:)
अश्विनी आणि अमृताने आपल्या सुमधुर आवाजात ठेकेदार non stop लावणी सादर केली.
सुजाता काकूंची मनाला भिडणारी वास्तववादी कविता, आणि सीमाची अर्थपूर्ण फराळावरची आणि मंडळातील काही जोडप्यांची नावे घेऊन तयार केलेली कविता , हे सर्व सर्वोत्तम होते. शैवीने आपल्या नृत्याची कुशलता दाखवलीच पण त्याचबरोबर छोटे जादूचे प्रयोग करून लहान-मोठ्यांना आश्चर्यचकित केले. यशचे कसिओ वादन ; कश्मिरा- प्राची चे "कोंबडी पळाली" वरचे दिलखुलास नृत्य, हे ही कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाले. शिल्पाने आयोजित केलेले वेगळ्या पद्धतीचे नंबर गेम्स सर्वाना खूप आवडले.ह्या वर्षी अजून एक नवीन कार्यक्रम झाला तो म्हणजे "भाऊबीज".जमलेल्या सर्व लहान मुलींनी सर्व लहान मुलांना ओवाळले.
अश्विनीने "तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे सुंदर गाणे आपल्या सुंदर आवाजात गाऊन लोकांच्या आग्रहाचा मान राखला. चार आकाशवाणी केंद्रे जर एका वेळेस लागली तर काय गम्मत घडेल ह्याची एक नाटिका अमृता, अनघा, श्रुती आणि दीपा यांनी खूप छान सादर केली. सर्व मंडळी नक्कीच पोट धरून हसत होते. अनघाने "फुलले रे क्षण माझे" हे गाणे सादर करून सर्वांचे क्षण फुलवले ! योगेश-पल्लवीने फोन वरील एक विनोदी संभाषण "गुळवणी बोलतोय " उत्स्फूर्ततेने सादर करून सर्वांची हसून हसून पुरेवाट लावली ! ह्याचा अर्थ आता मंडळात, कसिओ, गाणे, नृत्य, तबला, नाटक, जादू, अशा विविध गुण असलेले मंडळी आहेतच,तर अजून कोण कोण "छुपे रुस्तम " आहेत त्यांनी पुढच्या कार्यक्रमात जरूर भाग घ्यावा म्हणजे कार्यक्रम आयोजित करणारेही ह्या वर्षी सारखे ,अजून जोमाने मस्तपैकी कार्यक्रम आयोजित नक्कीच करतील !!
एवढ्या सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला. गोड म्हणून रस मलई होती. शिवाय आपल्या मंडळातले "activ member" परेश-प्राची हे ओस्लो सोडून नॉर्वे मध्ये दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणून त्यांनी काही मिठाई आणली होती. त्या दोघांना पुढील आयुष्यासाठी आपल्या मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळी म्हटले कि आपल्याला फटाकेही आठवतात. बरोब्बर ! सागर काकाने ह्या वर्षीही लहान मुलांसाठी फुलबाजी आणली होती. सर्व मुलांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला.आणि मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

-- दीपा ताडे

Kojagiri Pornima 2011

Slide show Kojagiri 2011

Slideshow Video Kojagiri 2011

Dance Video Kojagiri 2011


Ganesh Chaturthi 2011

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा

आपल्या सात्विक रुपाने भुरळ घालणाऱ्या अणि सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे ह्या वर्षी गुरुवारी १ सप्टेम्बरला आगमन झाले. सकाळी ८ वाजता नांदेडकर जोडप्याने पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. कामाचा दिवस असल्यामुळे पूजेला उपस्थित राहु न शकल्यामुळे मंडली उदास होती, परंतू रोज ३ दिवस सकाळी अणि संध्याकाळी आरती असल्यामुले जरा भांड्यात जीव पडला होता !पल्लवीने ह्या वर्षी बाप्प्पा साठी खूपच सुंदर, मनोहर आरास-मखर केली होती. बाप्पाला आराम करायला दोन्ही बाजूस छोटे छोटे २ लोड केले होते. आता पृथ्वीच्या एवढ्या उत्तरेला यायचे म्हणजे आल्यावर आराम नको का बाप्पाला !! संध्याकाळ च्या आरतीला काही नविन मंडली आली होती तेहि चक्क तबला घेउन... धूप-अगरबत्ती, निरांजन, घंटा, तबला, यांच्या संगतीने विविध आरत्या म्हटल्या...अगदी रंगल्या..आम्ही लहान असतो तर त्या ठेक्यावर नाचलोच असतो !! वातावरण एकदम प्रसन्न झाले होते.रोज आरतीला खिरापत,मिठाया,फले,असे विविध नैवेद्य दाखवले जात होते. शनिवारी गणेश विसर्जनाचा दिवस ठरला होता. दुपारी १२ वाजता सर्व मंडली जमाली. त्यामधे बाल गणेशही बरेच होते.काही मंडली च्या एकत्र बसून २१ वेळा श्री अथर्वशिर्शाचे आवर्तानाने वातावरण एकदम मंगलदायी बनले. आरती नंतर श्री गणेशाला श्रीखंड , उकडीचे , तळलेले मोदक असा " खरा " (मोदकांचा ) नैवेद्य दाखविला!!. सर्व मंडळीही मोदकंवर खुश होती! मनसोक्त भोजना नंतर करमणुकीचा कार्यक्रम झाला. अन्ताक्षरी, डम्ब शेराड्स , खेल खेळून नविन चित्रपटांची मात्र नक्कीच ओळख झाली ! ह्या वर्षी अजून एका "असामी " च सहवास आम्हाला लाभला. त्या म्हणजे .." सौ. प्रतिभा मेंढेकर " --मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका ! संपूर्ण दिवसभर त्या सर्वांमधे इतक्या समरस झाल्या होत्या की शेवटी त्यांचे "टायटल" समल्याने सर्वांना आनंद , आश्चर्य आशा मिश्र भावना निर्माण झाल्या..ह्याला "दुग्ध-शर्करा योग" म्हणायला काहीच हरकत नहीं!! त्या स्वतः एक शास्त्रीय गायिका असल्यामुळे आम्ही त्याना गाणे ऐकविण्याची मागणी केली. पण चहाशिवाय गळा मोकळा होईल का? शिवाय इतके साग्रसंगीत जेवण करून गुंगी चढलेल्या शरीरालाही जागे करणे भाग होते.....बरोब्बर. !!---चहापान झाल्यावर "प्रतिभा मेंढेकर " यांनी त्यांच्या मुग्ध स्वरामध्ये सर्वाना रमवून, गुंगवून टाकले. ! संध्याकाळी प्रसाद म्हणून शिवाय आपल्या गोड बातमीमध्ये सहभागी करायला म्हणून प्रतिभा - सचिन ने सर्वाना जिलेबी वाटली. कारणही तसेच होते म्हणा....नुकतेच त्यांच्या घरी "बाल गणेशाचे" आगमन झाले होते!! आरती करून "मंगलमुर्ती मोरया ",पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषामध्ये बाप्पाचे विसर्जन झाले. पण ह्या ३ दिवसांच्या जोरदार कार्याक्रमुळे नि विविध नैवेद्यामुळे बाप्पा नक्कीच खुश झाले असणार !!!

Summer Picnic 2011

Slideshow Summer Picnic 26th june 2011

सर्वांचे मनापासून धन्यवाद ! कार्यक्रम यशस्वी आणि आनंदात पार पडला याविषयी दुमत नाही.
विशेष धन्यवाद अरुण काकांचे , नेहमीप्रमाणेच यावेळेस देखील पुढाकार घेवून आवश्यक त्या गोष्टी वेळच्या वेळी घडवून आणल्या त्याबद्दल.
सुंदर रीतीने कार्यक्रम गुंफला त्या बद्दल योगेश आणि अश्विनी यांचे कौतुक आणि आभार !
सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग वाखाणण्याजोगा होता. खूप सारे व्हरायटी आणि चविष्ट पदार्थ खावून तृप्त वाटले.
मजा आली , धमाल केली. कालच्या दिवसाची खरोखरच अविस्मर्णीय भेट मिळाली !
हवामान देखील स्वच्छ अनुकूल असल्यामुळे दुधात साखरेचा योग आला ! सुरेल गाण्यांची तेव्हढी बरसात झाली !
अमृताच्या गाण्यातल्या 'नभातल्या चांदण्या'ने सर्वांना भिजवून टाकलं. अश्विनी च्या 'दृष्ट लागण्या जोगे सारे'
गाण्यानंतर आम्हीही सुखी संसाराला गालबोट नको लागू देवू म्हणून साकडं घातलं देवाकडे !
अवीट गोड गाण्यांच्या मैफिलीत न्हावून निघायला अजून आवडलं असतं.काहीसे थोडेसे कला सादरीकरण अजून झाले असते तर 'चार चांद' लागले असते.
पप्पांच्या 'अशी पाखरे' स्वरांनी भावूक केलं ! मग मी ही माझं घोडं दामटून एक गाणं ठोकून दिलं (न ऐकून जाताल कुठे लेकहो या अविर्भावात ?)
विनोद सांगण्यासाठी उत्साही कार्यकर्ते सरसावले आणि मग उत्तमोत्तम मनोरंजनाचा खजिना बाहेर पडला हत्ती-मुंगी,
इंटरनेट,नवरा-बायको ईत्यादी .'चीट गेम्स ' मधील पनिश्मेंटस सर्वांनी खेळकर पणाने घेतल्यामुळे त्यातला मजेशीर पणा अनुभवता आला.
'डंब श्यारेडस' मध्ये म्हणी ओळखण्याच्या कार्यक्रमात मात्र सर्वांचा कस लागला , नवनवीन म्हणी त्यानिमित्ताने वापरल्या गेल्या.
बालगोपाळांची देखील मजा झाली , खेळण्यासाठी मैदानाची ची मर्यादा त्यांना नामंजूर असावी, त्या सर्वांनी खूप भटकंती केली.
मराठी मंडळ मध्ये यावेळेस नवीन सहभागी झालेले 'आरीन' चे सर्वांनी जिलेबीचा आस्वाद घेत स्वागत केले :-)
कालचा दिवस खरं तर संपू नये असंच वाटत होतं. मैदानी खेळात रंग चढत येत असतानाच चहाचा पुकारा झाला नि मग मात्र बक्षीस समारंभ नि आभार प्रदर्शनानंतर
सर्वांचा समारोप घेण्याची वेळ आली अशी एक नकोशी वाटणारी जाणीव झाली. खूप काही साठवून ठेवण्यासाठी देवून गेलेला हा दिवस भरून पावला. शब्द थिटे पडतात अनुभव कथन करताना त्याची प्रचिती आली आज हे लिहिताना.
शब्दांची ही मर्यादा जाणून , असाच उत्साह टिकून राहू देण्याच्या विनंतीसह रजा घेतो !
ता. क. (ताजा कलम) :-
पुढील आकर्षण मराठी मंडळ कडून सविस्तर जाहीर होईलच , तेव्हा प्रत्येक नव्याने उगवणारा हा दिवस स्वच्छंदी मनाने जगू या
आणि वितळायच्या आत या आयुष्य रुपी आईस्क्रीम चा आस्वाद मनमुराद लुटुया !
:-)
स-स्नेह,
मंगेश
मराठी मंडळ
ओस्लो, नॉर्वे

Deepawali 2010

आली माझ्या घरी ही दिवाळी.
दिवाळी म्हणजे सगळीकडे उत्साह, चॆतन्य. आकाश कंदील, पणत्या, फ़राळ, पुजा. लहान मुलाना फ़टाके, नवीन कपडे ह्यांची ओढ लागलेली असते. २०१० ची दिवाळी असाच सर्व उत्साह मनात ठेउन सगळे तय्य़ारीला लागले होते.
अमृता – सागर, परेश – प्राची, आश्विनी – सोनाली ह्या मंडळीनी कार्यक्र्म आयोजित केले होते. सोनाली आणी प्रेश ह्यानी उत्कॄष्ट रित्या सुत्रसंचालन पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांनी एकमेकांची ओळख करत झाली.
व्यासपीठावर येउन आपली ओळख सांगुन फ़राळाची प्लेट घ्यायची असा गमतीदार उपाय काढल्यामुळे प्रत्येकाला व्यासपीठावर येणे भाग पडले आणी त्यामुळे नवीन आलेली मंडळी नीट लक्षात राहिले. फ़राळा मध्ये चकली, चिवडा, लाडु, शेव, शंकरपाळी, पाकातल्या चिरोटया असे सर्व काही होते, त्यामुळे पहिल्यांदाच देशाबाहेर राहीलेल्या मंडळींना आपण दिवाळी चुकलो असे वाटले नाही. अमृता, परेश यांनी प्रश्न मंजुषा तयार केली होती. आश्विनी आणी प्राची यांनी श्री आणी सॊ ह्यांच्यात स्पर्धा आयोजीत केली होती. अमृता, अश्विनी आणी प्राजक्ता ह्यांनी सुंद्र गाणी सादर केली. दीपाने “ती फ़ुल राणी” मधील मंजुळेचे काही संवाद उत्कृष्ट पणे सादर केले. नेहमी प्रमाणेच शॆवी ने केलेले नाच, लहान मुलांचे नाच व गाणे असा विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने समारंभात बहार आली.
आणी सर्वात सुंदर एक कार्यक्रम झाला तो म्हणजे लहान मुलाना फ़ुलबाज्या उडवायला मिळाल्या, त्यामुळे सर्व मुले सागर काकावर जाम खुश झाले होते.
जेवणातही शाकाहरी आणी मांसाहरी पदार्थांवर सर्वांनी येथेच्छ ताव मारला. सर्वाना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देत सर्व मंडळीनी निरोप घेतला.

Video Deepavali 2010

Slideshow Deepawali 2010

Video Amruta Sonandkar 2010

Video Ti Fula Rani 2010

Video Ashwini Nandedkar 2010

Video Prajakta Ranade 2010

Shavi Dance 2010

Shaivi Dance 2010 2

Video Kids Dance 2010

Video Kids Dance II 2010

Video Yogesh & Pallavi 2010

Ganesh Chaturthi 2010

Video Ganesh Chaturthi 2010

Video Shaivi Dance 2010

Video Amruta Song 2010

Video Mangesh Song 2010

Video Saurabh Song 2010

Slideshow Ganesh Chaturthi 2010

Deepavali 2009

Slideshow Deepavali 2009

Slideshow Video Diwali 2009

Diwali Introduction 2009

Diwali Info 2009

Groupdance Video Diwali 2009

Amruta Song Video Diwali 2009

Shaivi dance Video Diwali 2009

Duet Video Diwali 2009

Natika Diwali 2009

Game Video Diwali 2009

Ganesh Chaturthi 2009

Slideshow Ganesh Chaturthi 2009

Summer Picnic 2009

Slideshow Summer Picnic 5th july 2009

Deepavali 2008

Slideshow Deepavali 2008

Bugadi Mazi - Amruta Sonandkar 7 MB

Aakashwani cha Gondhal - Ketaki Tade & Co

Raja Pandharicha - Vishwas Ranade / Tabla by Jayant More

Tichi Chal Turu Turu - Nitiraj Jagdale

Tinka Tinka Jara jara - Sushmita

दिवाळी म्हणजे सर्वांना नातेसंबंधसांगणारी. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, रंगीबेरंगी रांगोळ्या, आकाशकंदील, दिव्यांचा झगमगाट, फ़टाके आणि फ़राळ!
अशी ही उत्साहमय वातावरण देणारी दिवाळी यंदाच्या वर्षी अतिशय अनोख्या रीतीने करण्याचे ठरले. ह्यावर्षी ब-याच मंडळींची वाढ झाल्याने दिवाळीच्या कार्यक्रमासाठी हॊल घेण्यात आला. नवीन आलेल्या तरुण मंड्ळींनी उत्साहाने हॊल सजवला, कार्यक्रमाची वेळ ११ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत अशी ठरवली. बेसन लाडू, चिवडा, सामोसे अशा फ़राळाने सर्वांचे स्वागत झाले आणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्री. अरविंद फ़ाटक यानी मराठी मंडळाचा थोडक्यात इतिहास सांगुन सर्वांची ओळख ’परेड’ झाली. मनोरंजनाच्या कर्यक्रमाची सुरुवात अमृताच्या सुरेल आवाजात सरस्वती मानवंदनेने झाली, त्यानंतर तरुण व रसिक मंडळींनी गाणी व श्री. रानडे यानी कांही गाणी व विनोद सादर केले. नितीराज ने ’हिची चाल तुरु तुरु’ व अमृता ने ’बुगडी माझी सांडली ग’ ह्या गाण्यानी मॆफ़ीलीत जोश आणला. आधल्याच दिवशी पुण्याहुन आलेल्या जयंत मोरे ने व अंकुर ताडे ने तबल्यावर उत्तम साथ दिली.
कार्यक्रमाला वेगळे वळण मिळाले ते एका छोट्याशा नाटिकेने, आकाशवाणीची चार वेगळी प्रसारणे एकदम लागली तर काय गंम्मत होते हे ह्या नाटिकेने सादर केले. त्यानंतर अर्थातच जेवणाचा कर्यक्रम पार पडला. बरेच दिवसांनी आपले घर सोडून परदेशी येउन दिवाळीला रसमलाई खाण्याचा आनंद सर्वांनी उपभोगला.
अशा रितीने ह्यावर्षीची दिवाळी अतिशय उत्साहात पार पडली. दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

-केतकी ताडे
ऒस्लो, नॊर्वे

Ganesh Chaurhi 2008

Slideshow Ganesh Chaturthi 2008

Ganesh Chaturthi 2008

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मराठी मंडळाचा गणपती बसवायचे ठरले आणी तेही श्री. अरुण ऒरंगाबादकर ह्यांच्या घरी. ह्यावर्षीचे मुख्य आकर्षण होते ते पुरषोत्तम कुलकर्णी ह्याने आणलेल्या गणेश मुर्तीचे! पुरषोत्तम ने भारतातुन छोटीशीच पण सुंदर मुर्ती अगदी नीट जपुन ओस्लो पर्यंत सुखरुप आणली.

सॊ. पल्लवी व श्री. योगेश पुराणीक आणी श्री. अनीरुद्ध धोंडगे ह्य मंडळींनी गणपती साठी एक सुरेख मंदीर बनवले. गणेश स्थापना ह्या वर्षी कामाच्या दिवशी होती तरी देखील बरीच मंडळी स्थापने साठी सकाळी हजर राहीली. संध्याकाळच्या आरतीची वेळ ६:३० ठरली, व कार्यक्रम आणी विसर्जन रविवारी करण्याचे ठरले. ठरल्या प्रमाणे रविवारी अथर्वशिर्षाचे २१ वेळा आवर्तन आणी मग आरती झाली, नंतर सगळ्या मंडळींनी मोदक, श्रीखंड पुरीची पंगत केली, आणी मग झाली कार्यक्रमाला सुरुवात. सॊ. अमृता सोनंदकर हीने एक छानसे शास्त्रीय गाणे आणी पुण्यातल्या घराची आठवण काढुन ’त्या तीथे, पलीकडे’ हे सुंदर गीत सादर केले. त्यानंतर सर्व मंडळीनी गाण्याच्या भेंड्या आणी ’डंब शेराडस’ खेळाची मजा लुटली. छोटया शॆवी ने ’आसावा सुंदर चॊकलेटचा बंगला’ हे गाणे सादर करुन बाळपणीच्या आठवणीत नेउन सोडले.

नंतर निरोप आरती म्हणुन उत्सव मुर्ती तशीच ठेउन सुपारीच्या ग्णपतीचे ’मोर्या ’ म्हणत विसर्जन केले. अशात-हेने गणपती बाप्पा गेल्याचे दुख: आणी सगळी मंडळी भेटल्याचा आनंद घेत सर्व मंडळी घरी परतले.

Slideshow Summer Picnic 21 june 2008

Summer Picnic 21st june 2008

उन्हाळा, सुटी म्हण्जे सगळ्यांनाच आनंदाचे दिवस, त्यतून नॊर्वेसारख्या देशात जवळ जवळ ४ - ५ महिने अंधारात आणी थंडीत काढ्लेल्या लोकांना उन्हाळा म्हणजे एक पर्वणीच! अशाच उन्हाळ्यात ह्यवर्षीची ’सम्मर पिकनिक’ २१ जुन, २००८ म्हणजेच वर्षातल्या सर्वात मोठया दिवशी ठरली.

ह्यावर्षी लोकं थोडी कमी असल्यामुळे श्री. अरविंद फ़ाटक यांच्या घरी पिकनिक करण्याचे ठरले. स्वच्छ उन्ह असल्यामुळे सर्वांनाच उत्साह होता. ह्यावेळेस बरीच नवीन मंडळी होती, त्यामुळे थोडा वेळ ओळ्ख, गप्पा ह्यात जाउन लगेच गरमागरम पावभाजी, पुलाव, ’ग्रील चिकन’ अशा चमचमीत खाण्याचा कार्यक्रम झाला. नंतर रात्रीचे ९ वाजले तरी बाहेर चकचकीत उन पाहुन्सर्वांनी जवळच असलेल्या ग्राउंडवर फ़ुटबॊल खेळण्याचे ठरले. तास भर खेळ्ल्या नंतर सर्व मंडळी ’गोड’ खाण्यास परत जमा झाली. आईस्क्रिम व आंबा ह्यावरती सर्वांनी येथेच्छ ताव मारला. खात - खातच थोडा वेळ बॆठे खेळ खेळ्ण्याचे ठरले. प्रतिमाने आणलेले उखाणे प्रत्येकाला वाचायचे होते, नुसतेच नाही तर प्रत्येकाच्या नव-याने मधे उभे रहायचे होते. नंतर शॆवी पुराणिक ह्या चिमुकलीने ’गोरी गोरी पान’ ह्या गाण्यावरती सुरेख न्रत्य केले.

अशा त-हेने ह्यावर्षीची ’सम्मर पिकनिक’ रात्री साडे अकराच्या सायंप्रकाशात संपन्न झाली!

- केतकी ताडे, ऒस्लो

Kavdekar Mami by Deepa Tade 4 MB

Summer Picnic - 21st june 2008

Just like Last year this year too Maharashtra Mandal Norway is arranging a summer picnic on 21 st june 2008.

The summer picnic this year is planned for the 21st June (Saturday) at Sætren Gård from 17:30 onwards. We plan to have a bonfire as per Scandanavian mid-summers day tradition. Dinner will be a mix of grill and Indian dishes. Details of the location and program will follow soon

Hisory of events from previous years

If you have any questions or suggestions please e-mail to:

Marathi mandal Norway:
karyakarini@marathimandal-norway.no

Other Useful Links:
Marathi Websoochi
Marathimandal Switzerland
Marathimandal Sydney
Maharashtra Mandal London
Brihan Maharashtra Mandal of North America (BMM)
Seattle Maharashtra Mandal
Maharashtra Mandal Kuwait
Maharashtra Mandal France
Maharashtra Mandal Singapore

Marathi News Papers:
Sakal
Loksatta
Lokprabha

Special Links:
G. D. Madgulkar
P. L. Deshpande
Geet Saragam
Sahitya Sampda
Sadha Sopa

Marathi Mandal Norway Copyright 2014 ©